Wednesday , April 22 2026
Breaking News

येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना आवाहन

Spread the love

 

येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने प्रतिवर्षी दहावी परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना साहित्य संमेलनामध्ये सन्मानित करण्यात येत असते, त्यासाठी विद्यार्थ्यांना साहित्य संघाच्या वतीने अवाहन करण्यात येते की, गतवर्षी दहावी परीक्षेत श्री शिवाजी विद्यालयात प्रथम, द्वितीय व तृतीय त्याचबरोबर मराठी विषयात केंद्रात प्रथम, द्वितीय व तृतीय तसेच मराठी विषयात गतवर्षीच्या दहावी परीक्षेत सीमाभागात सर्वाधिक गुण घेऊन प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षिसे देऊन साहित्य संमेलनामध्ये गौरव करण्यात येणार आहे. यासाठी दहावी परीक्षेत श्री शिवाजी विद्यालयात प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांसाठी कंत्राटदार किरण धामणेकर यांच्याकडून 4000/- रुपयांचे पारितोषिक विभागून ठेवले आहे, त्यांनी आपले वडील कै. मारुती मल्हारी धामणेकर यांच्या स्मरणार्थ ही बक्षिसे ठेवली आहेत. त्याचबरोबर प्रा. वाय. एन. मेणसे यांनी आपली पत्नी कै. सुमित्रा यल्लोजीराव मेणसे यांच्या स्मरणार्थ, सीमाभागात मराठी विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांसाठी 5000/- हजार रुपयांचे रोख बक्षीस, त्याचबरोबर केंद्रात मराठी विषयात प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांसाठी विभागून 4000/- रुपयांचे बक्षीस ठेवले आहे. त्याचबरोबर परशराम निंगाप्पा मेणसे यांच्याकडून श्री शिवाजी विद्यालय केंद्रात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांसाठी 2000/- रुपयांचे बक्षीस, त्याचबरोबर शिवाजी विद्यालय केंद्रात विज्ञान विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांसाठी रवींद्र पठाणी यांच्याकडून 1000/- रुपयांचे बक्षीस असणार आहे, त्याचबरोबर इंग्रजी विषयात शिवाजी विद्यालय केंद्रात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांसाठी एस. एम. मासेकर यांच्याकडून 1000/- रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. यासाठी साहित्य संघाच्या वतीने अवाहन करण्यात येते की, श्री शिवाजी विद्यालय केंद्रातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेमध्ये पहिले तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांची नावे विद्यार्थ्यांच्या मार्क्स कार्डसह स्वतःच्या सही शिक्क्यानिशी श्री शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. बी. बाचीकर यांच्याकडे सोमवार (ता. 13) फेब्रुवारी 2023 पर्यंत जमा करावीत, नंतर आलेल्या विद्यार्थ्यांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

About Belgaum Varta

Check Also

बेकायदा खाणप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

Spread the love  किणयेतील प्रकार; दोन जागांतून शासनाची लाखोंची फसवणूक बेळगाव : बेळगाव तालुक्यातील किणये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *