Monday , September 21 2026
Breaking News

विमल फाउंडेशनच्या वतीने 5 फेब्रुवारी रोजी भव्य चित्रकला स्पर्धा

Spread the love

 

बेळगाव : श्री. किरण जाधव संचलित विमल फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्यावतीने “आझादी का अमृत महोत्सव” निमित्त रविवारी दिनांक 5 फेब्रुवारी रोजी शाळांमध्ये भव्य चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

भाजप कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव आणि सकल मराठा समाज संयोजक किरण जाधव हे विविध उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्याबरोबरच सामाजिक उन्नतीसाठी आपल्यापरीने कार्यरत आहेत. आपला माणूस म्हणून समाजात त्यांनी ओळख निर्माण केली आहे. समाजोन्नतीबरोबर लोकांमध्ये एकता आणि अखंडता राखण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. याच अनुषंगाने बेळगावमधील शालेय विद्यार्थ्यांकरिता चित्रकला स्पर्धा आयोजिण्यात आल्या असून याकरिता विमल फाउंडेशन 206 शाळांमधील सुमारे 1.5 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आहे.

या स्पर्धेतील पहिल्या फेरीत 78 शाळा सहभागी होणार असून यामध्ये सुमारे 43 हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
रविवारनंतर उर्वरित शाळांची पुढील फेरी संबंधित शाळांच्या उपलब्धतेनुसार आठवडाभरात घेतली जाणार आहे.

या स्पर्धेला प्रतिसाद लाभला याकरिता शाळा आणि महाविद्यालयांचे व्यवस्थापन मंडळ, शिक्षक, पालक पत्रकार यांनी विशेष सहकार्य केल्याने विमल फाउंडेशन च्यावतीने किरण जाधव यांनी या सर्वांचे आभार मानले आहेत.

यावेळी श्री. सतीश नाईक, श्री. किशोर काकडे, सौ. सुशीला रायकर, सौ. वाणी नंदगडकर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *