बेळगाव : यल्लम्मा देवीचे दर्शन करून परतत असताना झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाली तर अन्य 13 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना अथणी क्रॉस जवळ घडली आहे.
विजयपूर येथे यल्लम्मा देवीच्या दर्शनाला जात असताना सिंदगी तालुक्यातील यरगल गावाजवळ दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. क्रूझरची जोरदार धडक बसल्यामुळे एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर 13 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अथणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta