बेळगाव : अपघातात जखमी झालेल्या युवकाचे उपचारादरम्यान मंगळवार दिनांक 7 रोजी निधन झाले.
हलगा येथील प्रवीण अरुण मास्तमर्डी असे या युवकाचे नाव आहे. प्रवीण अरुण मास्तमर्डी (वय 34) या युवकाचा अपघात झाला होता. त्याला अधिक उपचार करता दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच मंगळवार दिनांक 7 रोजी त्याची प्राणज्योत माळवली. त्याच्या निधनाने मास्तमर्डी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रवीण हा प्रगतशील शेतकरी होता. प्रवीणच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, एक भाऊ, एक बहीण, असा परिवार आहे. मंगळवार दिनांक 7 रोजी सायंकाळी पाच (5) वाजता हलगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta