बेळगाव : कर्नाटक राज्य हरळ्ळया (चर्मकार) समाजवतीने रविवार दिनांक 5 मार्च रोजी राज्य स्तरीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात प्रोत्साह फाउंडेशनच्या पुढाकाराने चर्मकार समाज मोफत वधूवर सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रोत्साह फाउंडेशनच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत 5 मार्च रोजी येथील कुमार गंधर्व रंगमंदिरात मोफत वधू वर सूचक आणि पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
फाउंडेशनचे अध्यक्ष वासुदेव दोडमणी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला उपाध्यक्ष भीमराव पवार, सदस्य सुरेश सांगली, मल्लिकार्जुन ताळीकोटी, गणपती वाघमारे,सदाशिव कट्टीमनी, संतोष होनगल, शंकर कांबळे, रवी होनगल, सल्लागार चंद्रकांत वाघमारे, हिरालाल चव्हाण आधी सदस्य उपस्थित होते.
या बैठकीत फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत वधू वर सूचक मेळाव्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानुसार इच्छुक वधू-वर आणि पालकांनी 5 मार्च सकाळी साडेनऊ ते दहा वाजेपर्यंत नोंदणी करावयाचे आहे.त्यानंतर दहा वाजता वधूवर सूचक मेळाव्याला प्रारंभ करण्याचे ठरविण्यात आले. तरीही इच्छुक समाज बांधवांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रोत्साह फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta