सरचिटणीस पदी श्रीकांत कदम यांची फेरनिवड
बेळगाव : मागील कार्यकरणीचा कार्यकाळ समाप्त झाल्यामुळे नवीन कार्यकारिणी निवडीचा निर्णय घेण्यात आला व अध्यक्षपदी श्री. अंकुश अरविंद केसरकर व सरचिटणीसपदी श्रीकांत कदम यांची एकमताने निवड करण्यात आली. अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर अंकुश केसरकर यांचा सत्कार नगरसेवक शिवाजी मंडोळकर व युवा नेते शुभम शेळके यांच्या हस्ते तर श्रीकांत कदम यांच्या सत्कार ज्ञानेश्वर मन्नुरकर यांनी केला. उर्वरित पदांसाठी येत्या 15 फेब्रुवारी पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.
तसेच येत्या 28 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने धरणे आंदोलन छेडले जाणार आहे ते आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला व युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी युवा समिती कार्यालयात नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी इतर विषयावर सुद्धा चर्चा करण्यात आली.
यावेळी अध्यक्ष अंकुश केसरकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, शुभम शेळके, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, सुरज कुडूचकर, संतोष कृष्णाचे, महेश जाधव, सचिन केळवेकर, बापु भंडागे, वासु सामजी, ज्ञानेश्वर मण्णुरकर, प्रविण रेडेकर, विनायक कावळे, मनोहर हुंदरे, भावेश बिर्जे, किरण मोदगेकर, साईनाथ शिरोडकर, अजय सुतार, नारायण मुंचडीकर, जोतीबा पाटिल, आंनद पाटिल, ओमकार आपटेकर आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta