बेळगाव : 1969 मध्ये मुंबई येथे झालेल्या सीमा आंदोलनात बलिदान दिलेल्या 67 हुतात्म्यांना बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने आज बुधवारी सम्राट अशोक चौक येथे अभिवादन करण्यात आले.
प्रारंभी जिल्हा प्रमुख शिरोळकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे आदींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी शिवसेनेने नेहमीच प्रश्न सुटावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. असे म्हटले.
माजी महापौर शिवाजी सुंठकर, प्रकाश शिरोळकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी महापौर सरीता पाटील, नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर, वैशाली भातकांडे, किरण गावडे, मनोज पावशे, राजकुमार बोकडे, प्रवीण तेजम, खानापूर समितीचे कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे, मुरलीधर पाटील, प्रकाश चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta