बेळगाव : किरण जाधव यांनी आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धा दि. 5 रोजी अचानकपणे रद्द झाल्यामुळे सर्व थरातून अजूनही निषेध व्यक्त केला जात असल्याचे समोर आले आहे. किरण जाधव यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून ही स्पर्धा आयोजित केली होती. परंतु स्पर्धे दिवशी सकाळी अचानकपणे शिक्षणाधिकाऱ्यांच्या दबावामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली. जवळजवळ 1 लाख 80 हजार विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये आपली नावे नोंदवली होती. ही स्पर्धा रद्द करण्यात आल्यामुळे विद्यार्थी वर्ग व त्यांचे पालक नाराज झाले आहेत. जनतेतून व पालकांतून या प्रकाराबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या प्रकाराची चौकशी करावी व या प्रकाराबद्दल खुलासा करावा अशा प्रतिक्रिया जनतेतून व पालकांतून व्यक्त होत आहेत. विद्यार्थ्यांच्या बाबतीतच असे होत असेल तर सामान्य जनतेला तर कोणी विचारणारही नाही. अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. किरण जाधव यांनी या प्रकरणाची चौकशी करावी व त्यांच्या पाठीशी जनता कायम उभी राहील, असेही म्हटले जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta