बेळगाव : जुना पी. बी. रोड येथील एका दर्ग्याजवळ अनोळखी मृतदेह आढळून आला आहे. अंदाजे मृत व्यक्तीचे वय 60 ते 65 आहे. शहापुर पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतला आहे. त्या वृद्धाचा मृत्यू आजारपणाने किंवा अशक्तपणाने झाला असेल असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत व्यक्ती 5 फूट 4 इंच, लांबट चेहरा, सरळ नाक, अंगाने सडपातळ, गहू रंगी असून कृत्रिम दात बसविले आहेत. अंगामध्ये पांढरा बनियन, पूर्ण हातांचा शर्ट, राखाडी पॅन्ट आहे. वरील व्यक्तीची कोणास ओळख पटल्यास त्यांनी शहापूर पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा. शहापूर पोलीस स्टेशन दूरध्वनी क्रमांक 0831-2405244, बेळगाव शहर पोलीस नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक 0831-2405233, पोलिस इन्स्पेक्टर शहापूर मो.9480804046. पीएसआय शहापूर मो. 9480804104 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे शहापूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta