बेळगाव : बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात महिला संघटना, आयक्यूएसी,एन.एस.एस., रेड क्रॉस, रेडरिबन विभागातर्फे “स्त्रीची सदृढ जीवन शैली” याविषयी विशेष व्याख्यान महाविद्यालयाच्या बी.ए.,बी.कॉम., बी.एस्सी.,एम.कॉम.आणि एम.एस्सी. च्या मुलींच्या साठी आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून बेळगाव केएलई जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्री-रोग तज्ञ डॉ. आर. प्रियंका उपस्थित होत्या. तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य जी. वाय. बेन्नाळकर होते.
कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवनाने झाली तद्नंतर प्रा. अर्चना भोसले यांनी प्रमुख अतिथी आणि वक्त्यांचा परिचय करून उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी प्रमुख वक्ताच्या रूपाने डॉ. आर. प्रियंका म्हणाल्या की, स्त्रियांनी बदलत्या काळाच्या जीवन शैलीमध्ये आपल्याला सुदृढ बनवण्यासाठी नियमित व्यायाम आणि सकस भोजन घेणे आवश्यक आहे. उत्तम आरोग्य जीवन जगण्यासाठी प्रेरणादायक असते. आजच्या स्रिया मोबाईलमध्ये आपल्याला अधिक गुंतवून इतर गोष्टीकडे दुर्लक्ष करीत आहेत. मोबाईलचा वापर केवळ आवश्यकते नुसारच केला पाहिजे. सर्वप्रथम आपल्या शरीराला आणि मनाला सदृढ बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यावेळी डॉ. आर. प्रियंका यांनी आहार नियंत्रण, जीवनशैली, झोप, मोबाईलचा वापर आणि स्त्रीच्या मासिक पाळी बद्दल सविस्तर माहिती दिली.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य जी. वाय. बेन्नाळकर म्हणाले आजचा युग स्त्री-युग आहे. या युगामध्ये स्त्री स्वतःला शारीरिक आणि मानसिक रूपाने सदृढ बनने आवश्यक आहे. सदृढ स्त्रीच स्व:ताला, परिवाराला सुंदर, समृध्द आणि शांत बनवून ठेवू शकते.
या कार्यक्रमाला नँक समन्वय अधिकारी प्रा.आर.एम. तेली, प्रा.जी.एम. कर्की, प्रा.सुरेखा कामुले, डॉ.डी.एम. मुल्ला, डॉ.एच.जे. मोळेराखी, प्रा.राजु हट्टी, प्रा.मनोहर पाटील, प्रा.जगदीश यळ्ळुर, प्रा. भाग्यश्री चौगले, प्रा.आरती जाधव, प्रा.एस. आर. नाडगौडा, प्रा.सीमा खनगांवकर प्रा.मनिषा चौगुले, प्रा. विठ्ठल कदम, इतर प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. वेदा शिवपुजीमठ यांनी आभार मानले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वृषाली कदम यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta