
बेळगाव (प्रतिनिधी) : आई-वडील हे आपले दैवत आहेत ज्याप्रमाणे आपण देव देवतांची सेवा आमच्या करतो त्याचप्रमाणे प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांची ही सेवा करणे आजच्या काळात गरजेचे आहे जर आई-वडिलांच्या आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल तर आपण या जगात कुठे पाठीमागे राहू शकत नाही, असे प्रतिपादन म. ए. समितीचे युवा नेते आणि उद्योजक आर. एम. चौगुले यांनी व्यक्त केले.
जानेवाडी येथील ब्रह्मलिंग मंदिर वास्तुशांती आणि लोकार्पण सोहळा कार्यक्रमात उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काळू नारायण गुरव हे होते.
जानेवाडी येथे सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यातून ब्रह्मलिंग मंदिराची गावकऱ्यांच्या सहकार्यातून श्री. ब्रह्मलिंग मंदिराची उभारणी करण्यात आली असून या मंदिराची वास्तुशांती आणि लोकार्पण सोहळा महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर करण्यात आला. या यासाठी शुक्रवारी सायंकाळी कळस मूर्तीची गावातून मिरवणूक काढून सायंकाळी रक्षण होमहवन करण्यात आला. त्यानंतर रात्री भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तर शनिवारी सकाळी नवग्रह मूर्ती प्रतिष्ठापना, अभिषेक, कळसारोहण, होमवन, आणि दुपारी तीन वाजता मंदिराचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मोनापा पावशे, कुमाण्णा गुरव बाळू गुरव, मल्हारी गोजेकर, नारायण होनगेकर, गुंडू होनगेकर, नागेश पावशे, बाळू होसुरकर, मधु गुरव, दत्तू गुरव, पुन्हाप्पा गोजगेकर, एन. के. कालकुंद्री, एस. आर. कालकुंद्री, सागर कटगेण्णवर आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांचा कमिटीच्या वतीने भगवा फेटा आणि पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. त्यानंतर फीत कापून मंदिराचे उद्घाटन आर. एम. चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले तर सायंकाळी या ठिकाणी माहेरवासिनींचा आहेर देऊन सत्कार करण्यात आला आणि सायंकाळी नामस्मरण व भारुडी भजनाचे आयोजन करण्यात आले. रविवारी दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक गोजेकर यांनी केले तर आभार अनिल गोजेकर यांनी मानले. या कार्यक्रमाला परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta