
बेळगाव : बेळगावला साहित्याची परंपराला लाभली आहे. सीमाभागात होणारी साहित्य संमेलने असेच प्रतीक आहे. येळ्ळूर गावात आयोजित केले जाणारे साहित्य संमेलन प्रत्येकालाच ऊर्जा देणारे आहे. केवळ महाराष्ट्र नव्हे देशातील अनेक गावांनी समृद्ध कसे व्हावे हा धडा या गावाकडून घेतला पाहिजे. गाव वैभव संपन्न करणारी माणसे प्रत्येक गावात पाहिजे, असे प्रतिपादन येळ्ळूर येथे ग्रामीण मराठी साहित्य संघातर्फे आयोजित केलेल्या अठराव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद कसबे (पुणे) यांनी केले.
संमेलनाच्या व्यासपीठावर उद्घाटक ऍड. सुधीर चव्हाण, स्वागताध्यक्ष रावजी पाटील, संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे, माजी महापौर सरिता पाटील, माजी एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, संदीप खन्नूकर, आर. एम. चौगुले, सुरेंद्र बरगांवकर, रमाकांत कोंडुसकर, दुध्दाप्पा बागेवाडी, माजी आमदार परशुराम नंदीहंळ्ळी, ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील आदी उपस्थित होते.
संमेलनाचे उद्घाटक ऍड. सुधीर चव्हाण म्हणाले, शिवरायाना पुन्हा पुन्हा आठविण्यासाठी अशी संमेलने गरजेची आहेत. बहुजनांची संमेलन मोठी विकसित व बहुआयामी होणे आवश्यक आहे. शिवरायांना समजून घेण्यासाठी शाहू, फुले, आंबेडकर यांना आधी समजून घेतले पाहिजेत. आपण आपली धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय बांधिलकी व अस्तित्व जाहीर करण्याची वेळ आली आहे. येळ्ळूर गावाला जशी साहित्य संमेलनाची परंपरा आहे त्याप्रमाणेच संघर्षाची धार आहे. मराठी भाषेवरील अन्याया विरोधीत लढ्यात हे गाव सक्रिय नेतृत्व करते. येळ्ळूर आणि बेळगावची ओळख साहित्य संमेलनाचे गाव म्हणून झाली आहे. अनेक संमेलने मोठ्या उत्साहात आणि लोकवर्गणीतून आयोजित केली जातात . त्यामध्ये वेगळेपण आणि वैशिष्ट्य जपणारे सर्वात मोठे संमेलन म्हणून या संमेलनाचा उल्लेख करावा लागेल. या साहित्य सम्मेलनांना अनेक नामवंत लेखक, साहित्यिक अध्यक्षपदी लाभले आहेत. शिवाय चित्रपट कलावंत देखील या साहित्य संमेलनाचे वैशिष्ट्य ठरते. येळ्ळूर गावाला जशी साहित्य संमेलनाची परंपरा आहे त्याप्रमाणेच संघर्षाची धार आहे. मराठी भाषेवरील अन्यायात हे गाव सक्रिय नेतृत्व करते. गोवा स्वातंत्र्य चळवळ, स्वातंत्र्य लढा, साराबंदी आंदोलनात हे गाव अग्रेसर होते. सीमाभागातील मराठी भाषा, संस्कृती जोपासण्यासाठी इथे साहित्य संमेलन साजरे केले जाते. मराठी भाषा टिकली तरच संस्कृती टिकेल असे ते म्हणाले.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष रावजी पाटील आपल्या आपल्या मनोगत बोलताना म्हणाले, मराठी साहित्य संमेलन हा सीमा लढ्याचा भाग आहे. हे सर्वाना मान्य करावे लागेल आम्हाला नव्या सूर्याची ओळख होईपर्यंत हा लढा लढत राहू. आमच्यासोबत साहित्याची शिदोरी सर्वाना जगण्याचे धैर्य देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संमेलनाच्या सुरुवातीला गावच्या वेशीपासून ग्रंथ दिंडीला सुरुवात झाली. मान्यवरांच्या उपस्थितीत पालखीचे पूजन करण्यात आले. पारंपारिक वाद्यांच्या गजरात गावातील प्रमुख मार्गावरून ग्रंथ दिंडी काढण्यात आली. ग्रंथदिंडीत पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या युवती, टाळमृदुंगासह हरिनामाचा गजर आणि छत्रपती शिवरायांचा जयजयकाराने ग्रंथ दिंडीत मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडले. विविध शिक्षण, साहित्य, सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
येळ्ळूर -येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्यावतीने देण्यात येणाऱ्या साहित्यिक, सामाजिक, पत्रकारिता, शिक्षण आणि क्रीडा पुरस्कार, रोहिदास जाधव (पुणे) ऍड. वर्षा देशपांडे (सातारा), मनोहर देसाई, मल्लिकार्जुन मुगळी, बबन कानशिडे, प्रदीप जुवेकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta