कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात महापालिका अपयशी
बेळगाव : बेळगाव शहर आणि उपनगरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. अनेक ठिकाणी मोकाट कुत्र्यांनी नागरिकांवर चाल करून त्यांना गंभीर जखमी केले आहे. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात आदर्श नगर राम कॉलनी येथील एका इसमाचा बळी गेला आहे. मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवाची माहिती असली तरीही महापालिका या संदर्भात ठोस कारवाई करण्यात अपयशी ठरली आहे.
आज शुक्रवारी अनगोळ कन्नड सरकारी प्राथमिक शाळा क्रमांक 18 येथे, दुपारी दीडच्या सुमारास पाच वर्षीय शिवमवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात शिवमच्या डोक्यात पाठीला जखमा झाल्या आहेत.
सदर घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते विनायक गुंजटकर यांनी जखमी शिवमला तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान आजच्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा बेळगावातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta