येळ्ळूर : श्री चांगळेश्र्वरी स्पोर्ट्स येळ्ळूर यांच्या वतीने श्री चांगळेश्र्वरी हायस्कूल मैदानावर आयोजित केलेल्या ग्रामीण क्रिकेट स्पर्धेत निल इंडियन बॉईज हिंडलगा संघाने एकदंत स्पोर्ट्स कणबर्गी संघाचा 5 गड्यांनी पराभव करून श्री. किरण जाधव चषक 2023 क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत एकूण 38 संघांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून स्पर्धा पुरस्कृते श्री. किरण जाधव उपस्थित होते. यावेळी विजेतेपद व उपविजेतेपद मिळविलेल्या संघाना श्री. किरण जाधव यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच वैयक्तिक पुरस्कारांचे सुद्धा वितरण करण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर म्हणून प्रतीक बाळेकुंद्री (निल इंडियन बॉईज) याची निवड करण्यात आली. तसेच स्पर्धेतील उत्र्कृष्ट फलंदाज म्हणून अमित(एकदंत स्पोर्ट्स) व उत्कृष्ट गोलंदाज म्हणून हरीश पाटील (श्री चांगळेश्र्वरी स्पोर्ट्स) याची निवड करण्यात आली तर मालिकावीरसाठीच्या स्पोर्ट्स सायकल पुरस्कारचा मानकरी सुशांत कोवाडकर (निल इंडियन बॉईज) ठरला. यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष श्री. सतिश बा. पाटील, श्री चांगळेश्र्वरी शिक्षण मंडळाचे सचिव श्री. प्रसाद मजुकर, प्रतीक मुगळीकर, विशाल टक्केकर, ग्राम पंचायत सदस्य प्रमोद पाटील, शिवाजी नांदुरकर, राकेश परीट, दयानंद उघाडे, राजू डोण्याण्णावर, कृष्णा बिजगरकर, हेमंत पाटील, जोतिबा नंदिहळ्ळी, नामदेव कदम, परशराम कणबरकर, उत्तम मंगणाकर आदी उपस्थित होते. अंतिम सामन्यासाठी पंच म्हणून श्री. प्रकाश करेलकर व प्रकाश पाटील यांनी काम पाहिले, तर स्कोअरर म्हणून ऋतुराज हलगेकर व समालोचक म्हणून बाबू पिंगट यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री चांगळेश्र्वरी स्पोर्ट्स येळ्ळूरच्या खेळाडूंनी परिश्रम घेतले. सुत्रसंचलन व आभार चेतन हुंदरे यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta