आमदार लक्ष्मी हेब्बाळकर सहभागी होण्याबाबतची उत्सुकता कायम!
बेळगाव : राजहंसगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती अनावरणाचा शासकीय कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. जिल्हा प्रशासन, कन्नड व संस्कृती खाते तसेच कर्नाटक रस्ते सुधारणा मंडळाकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गुरुवारी (ता. 2) सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते मूर्तीचे अनावरण होणार आहे. बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान देण्यात आले आहे. कार्यक्रमाला पालकमंत्री गोविंद कारजोळ, धर्मादाय खात्याच्या मंत्री शशीकला जोल्ले, कन्नड व संस्कृती खात्याचे मंत्री सुनीलकुमार तसेच जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार व महामंडळांचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
जिल्हा प्रशासन व कन्नड संस्कृती खात्याकडून मंगळवारी या कार्यक्रमांची निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे आता 2 मार्चला अनावरण कार्यक्रम होणार हे नक्की झाले आहे. मात्र, 2 मार्चच्या कार्यक्रमात आमदार हेब्बाळकर सहभागी होणार का, याबाबतची उत्सुकता कायम आहे.
Belgaum Varta Belgaum Varta