बेळगाव : कावळेवाडी (ता. बेळगाव) भाषा ही सर्वश्रेष्ठ आहे. तिचे जतन करणे आवश्यक असते. बोलीभाषा आपल्याला जगायला शिकवते. व्यवहार करताना आपण अधिक जवळ येतो ते भाषेमुळे. पुस्तके वाचणे, लिहिणं, व्यक्त होणं हिच खरी गरज आहे, असे प्रतिपादन तेजस्वीनी कांबळे हिने कावळेवाडी वाचनालयतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
प्रारंभी थोर साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जोतिबा बा. मोरे उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी तेजस्वीनी कांबळे हिने कुसुमाग्रज यांच्या साहित्याचा आढावा घेतला.
प्रास्ताविक मनोहर प. मोरे यांनी केले.
यशवंतराव मोरे यांनी आपल्या भाषणात मराठी भाषा टिकवण्यासाठी वाचनालय तील पुस्तके वाचली पाहिजेत, पालकांनी मुलांना मराठी शाळेत पाठवणे आवश्यक आहे. मातृभाषेतील शिक्षण महत्त्वाचे आहे असे मौलिक विचार मांडले.
यावेळी व्यासपीठावर जोतिबा मोरे, अरुण कणबरकर, लक्ष्मण जाधव, अनंत बाचीकर, यलापा ओऊळकर, यशवंतराव मोरे, यशवंत जाधव, सूरज कणबरकर, पृथ्वी जाधव, कांचन सावंत, उपस्थित होते.
यावेळी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी समुहनृत्य सादर करून वाहवा मिळवली. सांस्कृतिक उपक्रमातून मराठी चा जागर करण्यात आला. वेषभुशा, वकृत्वातून मुलांनी आपल्या कला सादर केल्या. दिनिका जाधव, मधुरा प. मोरे, दर्शना जाधव, सुहानी पाटील, निकिता यळूरकर, आदिनी कला सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.
अभिषेक सुतार, एम. पी. मोरे, गोपाळ जाधव, प्रसाद जाधव, महेश प. मोरे, उपस्थित होते.
सूत्रसंचालन सूरज मोरे, आभार पृथ्वी जाधव हिने मानले.
हा कार्यक्रम वाचनालयचे संस्थापक अध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी पुरस्कृत केला होता.
Belgaum Varta Belgaum Varta