Thursday , March 5 2026
Breaking News

छत्रपती संभाजी राजेंना समितीचे खरमरीत पत्र

Spread the love

 

बेळगाव : रविवारी काँग्रेसच्या विद्यमान आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना बोलावून राजहंसगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दुसऱ्यांदा अनावरण करण्यात आले. महाराष्ट्रातील नेत्यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहू नये अशी समस्त सीमावासीयांनी विनंती केली होती. मात्र त्या विनंतीस न जुमानता छत्रपती संभाजीराजे, आमदार सतेज पाटील आणि लातूरचे आमदार धीरज देशमुख यांनी उपस्थिती दर्शविली. तसेच धीरज देशमुख यांनी या कार्यक्रमात “जय कर्नाटक”चा नारा देत सीमावासीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे. त्यांच्या या कृतीचा तसेच छत्रपती संभाजी राजे कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी लिहिलेले खरमरीत पत्र….
महोदय, रविवार दिनांक 5 मार्च 2023 रोजी किल्ले राजहंसगड बेळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमास हजर झाला. त्याबद्दल सीमावासियांच्या भावना इथे व्यक्त करीत आहे. मराठी भाषेसाठी गेली 66 वर्ष मराठी माणूस निरंतर लाठ्याकाट्या झेलत संघर्ष करत आला आहे. अनेक लोकांनी जीवाचे बलिदान देऊन हा संघर्ष तेवत ठेवला. राजहंगडावर शिवमुर्तीची जी प्रतिष्ठापना करण्यात आली त्या पाठीमागे व त्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या पाठीमागे राजकीय पार्श्वभूमी होती. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीने आपणास या कार्यक्रमास हजर न होण्याची विनंती केली होती. कर्नाटक राज्यात अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली. त्या विरोधात मराठी माणसाने वेळोवेळी केला. प्रसंगी कारावासही भोगला. त्या संघर्षाचा संदर्भ देत आपणास त्या कार्यक्रमास हजर न होण्याची विनंती करण्यात आली होती. आम्ही आजवर छत्रपतीच्या गादीचे वारस म्हणून तुम्ही आमच्या सोबत आहात असे मानत होतो. परंतु आमच्या ह्या समजाला तुम्ही हरताळ फासला आहे. तुमच्या उपस्थितीतच महाराष्ट्रातील आमदार देशमुख यांनी “जय कर्नाटक” असे उद्गार काढले. आपण पतीचे वारस म्हणवता तर मराठी विरोधी या घटनेचे आपण साक्षीदार होऊन सीमावासियांच्या आदरास पात्र ठरत आहात. मराठी माणसाच्या याला तुम्हाला बळ देता येत नसेल तरी तुमच्याकडे आमचा आग्रह नाही पण ज्या छत्रपतींचे नाव घेऊन सीमाभागात मराठी माणूस लढतो त्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम आपण करू नये ही विनंती. बेळगावतील मराठी माणसाचा लढा हा छत्रपतीच्या रयतेचा आहे. आपण त्याचे पाईक मानले जाता तरी कृपया मराठी माणसाचा आपण घात करू नये, अशी सीमा भागातील जनतेची इच्छा आहे. कोल्हापूरकर जनतेने नेहमीच बेळगावकर जनतेची पाठराखण केली. आपण आपली भूमिका कोल्हापूरच्या जनतेसारखी ठेवाल अशी अपेक्षा. नाहीतर कोल्हापूरकर जनतेची आणि तुमची नाळ तुटली आहे काय? अशी शंका येण्यास वाव मिळतो. छत्रपतीच्या विचाराचे आम्ही वारस आहोत त्यांच्या नावाने आम्ही लढा देत आहोत. आम्ही नक्कीच विजयी होणार आहे. तुम्ही आमच्या सोबत यावे ही श्री चरणी प्रार्थना कळावे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मनपाचे ‘ऑपरेशन लायसन्स’; नियम धाब्यावर बसवणाऱ्या बड्या शोरूम्सना दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानंतर आता शहरभर आरोग्य निरीक्षकांचे पथक मैदानात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *