बेळगाव : राजहंस गडावरील हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती व बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने दुग्धाभिषेक करण्याबाबत चर्चा करण्यासाठी सदर बैठक बोलावण्यात आली आहे. ही बैठक बुधवार दिनांक ८ रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता मराठा मंदिर मंगल कार्यालय (रेल्वे ओव्हर ब्रिज) येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला महाराष्ट्र एकिकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी, आजी माजी लोकप्रतिनिधींनी, युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व समस्त शिवभक्तांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस ऍड. एम. जी. पाटील, बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्ष दीपक दळवी, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta