बेळगाव : हिंडलगा येथील बॉक्साईट मुख्य रस्त्या शेजारी लावण्यात आलेल्या कचरा वाहू करणाऱ्या ट्रॅक्टरला अज्ञात व्यक्तींनी आग लागल्याची घटना आज मंगळवारी सायंकाळी 4 वाजता घडली आहे.
गेल्या पाच वर्षांपासून हिंडलगा ग्रामपंचायत क्षेत्रातील मधील घरोघरी जाऊन कचरा उचल करण्याचे काम ट्रॅक्टरच्या माध्यमातून करण्यात येते.आज सुट्टी असल्याने कचराने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली हिंडलगा येथील बॉक्साइड रस्त्याशेजारी लावण्यात आली होती. त्या ट्रॅक्टर ट्रॉलीला अज्ञात व्यक्तीने आग लागल्यामुळे 40 ते 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. एपीएमसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गावातील काही सामाजिक कार्यकर्ते यांनी ट्रॅक्टरला आग लागल्याची समजता धाव घेऊन आग विझवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला. श्रीराम सेना जिल्हाध्यक्ष रवी कोकितकर आणि हिंडलगा ग्रामपंचायत उपाध्यक्ष भाग्यश्री कोकितकर यांनी घटनास्थळी भेट दैऊन पाहणी केली. यावेळी आकाश लाखे, अरुण भोसले, सचिन खोरागडे, श्याम ढावाळे, रोशन भोसले, अजय कुरबर, आदित्य कुरबर, रोहन कुरबल, साहित्य इतर यावेळी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta