Share

राजू पोवार : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
निपाणी (वार्ता) : दीड वर्षांपूर्वी शेंडूर गावातील शेतकऱ्यांनी सर्वांच्या संमतीने दहा फूट रस्ता आपल्या शेतामध्ये सोला होता. सध्या या गावामध्ये पवनचक्की व सौरऊर्जा प्रकल्प आलेला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना विश्वासात न घेता, नोटीस न पाठविता कंपनीकडून रस्ता रुंदीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांची २५ ते २० एकर शेती रस्त्याच्या अतिक्रमणामध्ये जात आहे.
यामुळे शेंडूर येथील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यावर कंपनी व प्रशासन शेतकऱ्यांना योग्य न्याय आणि भरपाई न दिल्यास राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा रयत संघटनेचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी दिला आहे. बुधवारी (ता.८) बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन दिले आहे.
यापूर्वी शेंडूर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तत्कालीन तहसीलदार प्रवीण कारंडे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ व पवनचक्की आणि सौरऊर्जा प्रकल्प अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा करण्यात आली होती. पण चर्चेवेळी ठोस निर्णय न झाल्याने रयत संघटनेने थेट जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
रयत संघटना चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार म्हणाले, हा रस्ता निर्माण करताना अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमधून हा रस्ता जात आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान होणार आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या प्रति गुंठ्याला एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी. गावच्या शेतीला नदीपासून पाणी पुरवठ्याची योजना करावी. हा प्रकल्प उभा राहणार असेल तर गावाला मोफत वीज पुरवावी. ज्या जमिनी कमी दरात घेतलेल्या आहेत,त्यांना वाढीव दर दिला पाहिजे. बुधवार पर्यंत (ता. १५) कंपनीने योग्य निर्णय घेऊन शेतकऱ्यांना सहकार्य करावे. अन्यथा रयत संघटना कधीही शांत बसणार नाही असा इशारा पोवार यांनी दिला आहे.
या नियोजनाच्या प्रती, ग्रामीण पोलीस ठाणे, निपाणी मंडल पोलीस निरीक्षक, प्रांताधिकारी, डीवायएसपी, मुख्यमंत्री यांच्यासह विविध अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.
यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष चुन्नापा पुजारी, शिवानंद मुगलीहाळ, राघवेंद्र नाईक, बाबासाहेब पाटील, रोहन नलवडे, रमेश पाटील, सागर पाटील रमेश उप्पन्नावर, शिवाजी लाड, विलास लाड, बाळू वरुटे, शिवाजी वाडेकर, संजय नाईक, संजय लाड, प्रतीक नाईक, बंडू लाड, पांडुरंग मिसाळ, महादेव मिसाळ, अण्णाप्पा वरुटे, सदाशिव वाडेकर, शिवाजी चौगुले, विठ्ठल अंबुले, संदीप ढोकरे, तानाजी ढोकरे, सागर लाड, महादेव पाटील, अण्णापा वरुटे, सचिन पाटील, बसवराज माने, आनंद माने, दशरथ ढोकरे, श्रीधर पाटील, रामदास कुमठेकर, दत्ता चौगुले, विठ्ठल कुमठेकर, शिवाजी अंबचले, लता घाटगे, संगीता घाटगे, वैशाली घाटगे, शांताबाई चौगुले, माया ढोकळे, बयाबाई ढोकळे, अश्विनी ढोकळे याच्यासह शेतकरी उपस्थित होते.
Post Views:
926
Belgaum Varta Belgaum Varta