बेळगाव : भाजपच्या विजय संकल्प यात्रेमुळे कार्यकर्त्यांमध्ये स्फूर्ती निर्माण झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीतजास्त जागा जिंकण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे आवाहन डॉ. रवी पाटील यांनी केले.
विजय संकल्प यात्रेला सुरुवात झाल्यानंतर ते बोलत होते.
भाजप आमदारांनी आपल्या कार्यकाळात मतदारसंघात अपेक्षेपेक्षा अधिक विकासकामे करून प्रभाव पाडला आहे. पक्षामध्ये कोणताही गोंधळ नसून भाजप उमेदवारांना विजयी करण्यासाठी सर्वांनी परिश्रम घ्यावेत, असे आवाहन माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी केले.
यावेळी भव्य रोड शो झाला. यामध्ये मंत्री शशिकला जोल्ले, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, भाजप जिल्हाध्यक्ष डाॅ. राजेश नेर्ली, आमदार महेश कुमठळ्ळी, अरुण शहापूर यांच्च्यासह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta