Thursday , March 5 2026
Breaking News

शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक मंगळवारी

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक मंगळवार दिनांक 14 मार्च 2023 रोजी दुपारी ठीक 4:00 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. या बैठकीत विधानसभा निवडणुक आणि राजहंसगड छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीपूजेसंदर्भात चर्चा केली जाणार आहे. शहर म. ए. समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते, युवक मंडळे व महिला मंडळे व नागरिक यांनी वेळेवर हजर राहावे व सूचना कराव्यात, असे आवाहन अध्यक्ष श्री. दीपक दळवी यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *