Tuesday , December 9 2025
Breaking News

राजहंसगडावरील छ. शिवाजी महाराज दुग्धाभिषेक सोहळ्यासाठी नियोजन कमिटीची स्थापना

Spread the love

 

बेळगाव : दिनांक 19/03/2023 रोजी होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराज दुग्धाभिषेक सोहळा व महाप्रसादाच्या कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक रंगुबाई पॅलेस येथे संपन्न झाली व यावेळी कार्यक्रम नियोजन कमिटी ठरविण्यात आली.
महाप्रसादाच्या नियोजनाची जबाबदारी येळ्ळूर- येळ्ळूर विभाग समिती व परिसरातील गावावर सोपविण्यात आली असून देणगी व साहित्य जमा करण्यासाठी जी कमिटी स्थापन करण्यात आली त्यामध्ये गुणवंत पाटील, अंकुश केसरकर, दत्ता उघाडे, रणजित चव्हाण पाटील, शिवराज पाटील व मनोहर संताजी यांचा समावेश आहे. महाप्रसादासाठी ज्यांना तांदूळ, डाळ, रवा, गूळ, तेल व देणगी द्यायची असेल त्यांनी सकाळी ११ ते दु. १ तसेच सायंकाळी ५ ते ८ या वेळेत रंगुबाई पॅलेस मध्ये शिधा व रोख देणगी स्वीकारून त्याची पावती देण्यात येईल असे आवाहन म. ए. समितीने केले आहे.
आजच्या बैठकीत इतर नियोजन कमिटी स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम नियोजन कमिटीचे सदस्य दीपक दळवी, मनोहर किणेकर, बी. ओ. येतोजी, राजाभाऊ पाटील, एम. जी. पाटील, प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, रमाकांत कोंडूस्कर, विकास कलघटगी, अमर येळूरकर, मदन बामणे, विनोद आंबेवाडीकर, श्रीकांत कदम, बाबू कोले, श्रीधर खंन्नूकर चंद्रकांत कोंडुस्कर, दत्ता उघाडे, महेश जुवेकर, नितीन खंन्नूकर, शुभम शेळके, श्रीनाथ मुळीक, सतीश चौगुले, रणजीत हावळनाचे, व्यंकटेश शहापूरकर, रणजीत पाटील, शिवराज पाटील, आप्पा गुरव, शिवाजी मंडोळकर, शिवाजी सुंठकर, सुनील अष्टेकर, आर आय पाटील, आर एम चौगुले, रामचंद्र मोदगेकर, सुधीर चव्हाण, आर के पाटील, भागोजी पाटील, पुंडलिक पावशे, सुरेश राजूकर, महादेव चौगुले, अजित यादव व इतर.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी २५ हजार शेतकरी उद्या सुवर्णसौधला घेराव घालणार

Spread the love  बेळगाव : राज्य सरकारच्या विरोधात अन्नदात्यांचा संताप अनावर झाला असून, उद्या शेतकरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *