
बेळगाव : बेळगाव बार असोसिएशन, बेळगाव इन असोसिएशन विथ आदिवासी परिषद कर्नाटक उत्तर, बेळगाव युनिट आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आज आंतरराष्ट्रीय महिला दिन सोहळा साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रम हा न्यू कोर्ट कंपाऊंड, हॉल बेळगाव येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी या कार्यक्रमाला प्रा. जिल्हा व सत्र न्यायाधीश, बेळगाव मुस्तफा हुसेन सय्यद आणि बेळगावी बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री. प्रभू एस. यत्नट्टी उपस्थित होते. यावेळी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी ऍडिशनल जिल्हा व सत्र न्यायाधीश, बेळगाव व माननीय अॅड. या कार्यक्रमात जिल्हा व सत्र न्यायाधीश, बेळगाव यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर वीर नारी, दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये सुनीता पाटील, रेखा खादरवाडकर, लक्ष्मी मस्के, रूपा देवण, लक्ष्मी कुटले, जयश्री सूर्यवंशी, बेबी अष्टेकर, वैशाली पाटील, इंदू टीबले, शुभांगी पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी सचिन आर. शिवण्णावर, सुधीर चव्हाण उपाध्यक्ष, जी. एन. पाटील, सरचिटणीस बंटी कपाई, प्रभाकर के. पवार, महांतेश टी. पाटील, अभिषेक उदोशी, इरफान वाई. पूजा बी. पाटील, तसेच बेळगाव बार असोसिएशनच्या ज्येष्ठ सदस्या जयश्री मंद्रोळी यावेळी उपस्थित होत्या.
यावेळी जी. एन. पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर शसदाशिव हिरेमठ यांनी आभार मानले. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta