
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने राजहंसगड येथील छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीला महाअभिषेक घालण्यात येणार आहे. रविवार दिनांक १९ मार्च रोजी सकाळी ११.०० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
बेळगाव तालुक्यातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येते की सदर कार्यक्रमानिमित्त महाअभिषेक व महाप्रसादचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या महाप्रसादाला जे कार्यकर्ते स्वेच्छेने वस्तू व आर्थिक स्वरूपात देणगी द्यायचे आहे त्यांनी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कॉलेज रोड येथील कार्यालयात शनिवार दिनांक १८ रोजी दुपारी चार पर्यंत जमा करायचे आहे. ही देणगी जमा करून कार्यकर्त्यांनी आपली पोचपावती घेण्याची आहे व या महाभिषेकला मोठ्या संख्येने बेळगाव तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी, महिला आघाडी कार्यकर्त्यांनी, युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावयाचे आहे, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर व चिटणीस अँड एम. जी. पाटील यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta