Thursday , March 5 2026
Breaking News

मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ताकद दाखवा; शिवसेना युवा सेनेतर्फे आवाहन

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे रविवारी (ता. १९) राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे. यावेळी युवा सैनिकांनी व मराठी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करावे, असे आवाहन शिवसेना युवासेनेतर्फे करण्यात आले.

राजहंसगडावरील दुग्धाभिषेक कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यासाठी गुरुवारी (ता. १६) युवासेनेच्या कार्यकर्त्यांची समर्थनगरात बैठक झाली.. विनायक हुलजी यांनी, राज्यातील विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. बेळगाव जिल्ह्यात मराठी माणसाचं वर्चस्व असल्याकारणाने मराठी माणसांत फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे सर्व मराठी
भाषिकांनी देव, देश व स्वभाषा यावर निष्ठा ठेवून कार्य करावे. आगामी निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाच्या व उमेदवाराच्या आमिषाला बळी न पडता फक्त सत्कर्म व देशहित हे ज्यांचे ध्येय आहे, त्यांनाच मत घालण्याची शपथ आपल्याला महाराजांपुढे घ्यायची आहे, असे सांगितले.
जेव्हा आपल्या देव, देश, धर्म व भाषेविरुद्ध समाजकंटकांकडून आवाज उठविला जातो, तेव्हा महाराष्ट्र एकीकरण समिती व शिवसेना या पक्षातील निष्ठावंत

कार्यकर्तेच आघाडी घेऊन त्यांचा विरोध करतात. मात्र, आता निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे मराठा समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्यावर्षी बंगळूरमध्ये जेव्हा शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाली, तेव्हा राजकीय पक्षांनी विरोधही केला नाही. याचा विचार करून प्रत्येकाने राजहंसगडावर उपस्थित राहून मराठी भाषिकांची ताकद दाखवावी, असे आवाहनही युवासेनेतर्फे बैठकीत करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *