
येळ्ळूर : राजहंसगड श्री शिवाजी महाराज दुग्धाभिषेक आणि महाप्रसाद तयारीला वेग आला असून येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते जोरदार तयारीला लागले आहेत. आज सकाळी कणबर्गी येथील जागृत देवस्थान सिध्देश्वर मंदिरातील महाप्रसादासाठी लागणाऱ्या मोठमोठ्या वीसेक हजार क्षमतेच्या चार कावली त्याबरोबर महाप्रसादासाठी लागणारी सर्व भांडी साहित्य माजी महापौर शिवाजी सुंठकर त्यांचे सहकारी श्रीकांत कृष्णोजी, परशराम मालाई, प्रकाश मुचंडीकर, केदारी गोवेकर, किसन सुंठकर यांनी उत्साहात साहित्य जमा करून महाप्रसाद तयार करण्यासाठी मदत करणार असल्याचे सांगितले.

यावेळी येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष दुद्दाप्पा बागेवाडी, येळ्ळूर पंचायत अध्यक्ष सतीश पाटील, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, युवा नेते दत्ता उघाडे, महाप्रसाद भांडी कमिटीचे सर्व सदस्य ग्राम पंचायत सदस्य जोतिबा चौगुले, दयानंद उघाडे, रमेश मेणसे, राकेश परीट, परशराम परिट, शिवाजी नांदुरकर, प्रकाश मालुचे, आनंद घाडी, तानाजी पाटील, बजरंग घाडी, उमेश नंदीहळ्ळी आदि कार्यकर्ते उपस्थित होते हे सर्व साहित्य घेऊन राजहंसगडाकडे प्रयाण करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta