बेळगाव : स्पर्धेत जय- पराजय ही दुय्यम बाब असून स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या कलागुणांना सादर करणे महत्त्वाचे आहे, असे भाजप कर्नाटक राज्य ओबीसी युवा मोर्चा सचिव आणि सकल मराठा समाजाचे संयोजक किरण जाधव म्हणाले.
कन्नड महिला संघ, साहित्य कला वेदिकेच्यावतीने रविवारी टिळकवाडी येथील दुसऱ्या रेल्वे फाटकानजिकच्या वरेरकर नाट्य भवन येथे आयोजित राग रंजिनी कन्नड गीत गायन स्पर्धा समारंभात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.
आपल्यातील अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी स्पर्धांचे आयोजन केले जाते. यामुळे स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेऊन आपले कलागुण सादर करावेत. स्पर्धेमुळे व्यासपीठावर उभे राहण्याचे धाडस येते. याशिवाय संघटन कौशल्य निर्माण होते असेही किरण जाधव म्हणाले. किरण जाधव यांचा स्पर्धा आयोजकांच्यावतीने सत्कार करण्यात आला.