Wednesday , December 10 2025
Breaking News

येळ्ळूर येथे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आधुनिक विकास कामांना चालना

Spread the love

 

बेळगाव : दिनांक 22 मार्च 2023 रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर येळ्ळूर येथे येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या पंधराव्या आयोगातून 2021-22 आणि 2022-23 अंतर्गत गावामध्ये ठिकठिकाणी हायमास्ट पथदीप आणि नामफलकाच्या उपक्रमाचे अनावरण तसेच सीसीटीव्ही सारख्या आधुनिक कामांना चालना देण्यात आली. तसेच अमृत ग्रामपंचायत योजनेअंतर्गत गावातील शाळांमध्ये प्रयोगशाळेसाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून देणे अंगणवाडींना लहान मुलांना खेळण्याचे साहित्य उपलब्ध करून देणे तसेच ई ग्रंथालयासाठी लागणाऱ्या सुधारित गोष्टी उपलब्ध करून देणे आधी कामांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.
विकासाच्या दृष्टिकोनातून येळ्ळूर ग्रामपंचायत नेहमीच अग्रेसर असते हे अगदी प्रकर्षाने दरवेळी पाहायला मिळते आणि याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायतीच्या पंधराव्या आयोगातून येळ्ळूर येथे हायमास्ट पथदीप आणि नामफलकाचे अनावरण करण्यात आले. या उपक्रमाला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर चालना देण्यात आली. यामध्ये गावातील प्रत्येक गल्ली, उपनगरे तसेच सार्वजनिक ठिकाणी नामफलक उभारण्याच्या कामाला शुभारंभ करण्यात आला. तसेच गावातील स्मशानभूमी चांगळेश्वरीदेवी मंदिर, समिती शाळा, वाडीशाळेसमोर, तसेच वाडीशाळा कन्नड आणि अवचारहट्टी येथे हायमास्ट पथदीप बसवण्याच्या योजनेचाही शुभारंभ करण्यात आला. यावेळी सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन रूपा पुण्यानावर आणि प्रमोद पाटील तसेच दलित संघटनेच्या माध्यमातून करण्यात आले. तसेच हायमास्ट पथदीपाच्या कामाचे पूजन शिवाजी नांदुरकर आणि रमेश मेणसे यांच्या हस्ते तर नामफलकाचे उद्घाटन अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आणि अनावरण दुदाप्पा बागेवाडी आणि मनोहर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला गुन्हेगारी व गैरकृत्यदेखील होऊ नये तसेच गावाच्या सुरक्षेसाठी गावामध्ये ठीक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याच्या कामालाही यावेळी चालना देण्यात आली. या कामाचे उद्घाटन आनंद आप्पाजी पाटील आणि राजू डोण्ण्यान्नवर यांच्या हस्ते करण्यात आले.
त्याचबरोबर अमृत ग्रामपंचायत योजनेअंतर्गत देखील वेगवेगळ्या उपकरण उपक्रमांना यावेळी चालना देण्यात आली जसे की गावातील शाळांमध्ये प्रयोगशाळेसाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून देणे, अंगणवाडींना लहान मुलांना खेळण्याचे साहित्य उपलब्ध करून देणे तसेच ई ग्रंथालयासाठी लागणाऱ्या सुधारित गोष्टी उपलब्ध करून देणे आधी कामांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.

यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील,
ग्रामपंचायत सदस्य शिवाजी नांदुरकर, प्रमोद पाटील, रमेश मेनसे, पिंटू चौगुले, परशराम परीट, रूपा पुण्यानावर मनीषा घाडी, शशिकांत धुळजी, अरविंद पाटील, राजू डोण्ण्यान्नवर, नारायण काकतकर, तसेच मुख्याध्यापक अशोक कोलकर सर आणि डि. एस्. एस् शाखा येळ्ळूर चे संस्थापक श्रीमान लक्ष्मण छत्र्याण्णावर, अध्यक्ष प्रमोदकुमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष शशिकांत हुव्वाण्णावर, सेक्रेटरी परशुराम ताशिलदार, महेश हुव्वाण्णावर, माझी अध्यक्ष महेश ताशिलदार, कार्यकर्ते शटूप्पा कांबळे, तसेच श्रीमान भिमराव पुण्यान्नावर, दिपक हंडोरी, रूकमान्ना हुव्वाण्णावर, सुनिल कांबळे, रवि शिंगे, राजु होसुरकर, शटूप्पा पुण्यान्नावर आदि सर्व इतर गावातील नागरिक व युवक मंडळचे कार्यकर्ते तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष; सुवर्णसौधला भाजपचा घेराव घालण्याचा प्रयत्न

Spread the love  बेळगाव : राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करत भाजप नेत्यांनी प्रचंड निदर्शने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *