बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे रविवार दि. 26 मार्च रोजी वार्षिक भव्य वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
रेल्वे ओव्हरब्रिज जवळील मराठा मंदिर येथे सकाळी 10.30 वा. हा मेळावा होणार आहे. यावेळी व्यावसायिक शीतल वेसणे हे प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यात इच्छुक वधू व वर यांची उपस्थिती बंधनकारक आहे याची नोंद घ्यावी. या मेळाव्याचा समाज बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta