बेळगाव – श्री ज्योतिर्लिंग देवस्थान वाडी रत्नागिरी कोल्हापूर येथे दवणापूर्णिमा यात्रा संपन्न होत आहे. दिनांक पाच एप्रिल रोजी रात्री पालखी सोहळा होणार आहे. या सोहळ्याला सालाबादप्रमाणे बेळगाव येथील नार्वेकर गेली येथून पायी जाणारे भक्त पालखी व बैलगाड्यांसह उद्या सोमवार 27 मार्च रोजी दुपारी चार वाजता ज्योतिर्लिंग देवस्थान नार्वेकर गेलेली येथून निघणार आहेत.
हेबाळ, संकेश्वर, निपाणी, कागल, कोल्हापूर येथे वस्ती करून दिनांक 1 एप्रिल रोजी ज्योतिबा डोंगरावर पालखी व भक्त पोहोचणार आहेत. दवणा व पालखी सोहळा करून दिनांक 10 एप्रिल रोजी कोल्हापूर सर्कल बेळगाव येथे आंबील व घुगऱ्यांची यात्रा करून पालखी नार्वेकर गल्ली बेळगाव येथील ज्योतिर्लिंग देवस्थानात परतणार आहे, असे देवस्थानातर्फे दादा अष्टेकर भक्त मंडळांनी कळविले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta