Thursday , March 5 2026
Breaking News

मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे वधू वर महामेळावा उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : लग्न जुळविताना इच्छुक वधू व वर तसेच पालकांनी तडजोड केल्यास अडचणी येणार नाहीत, असे प्रतिपादन मराठा समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले.
मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे मराठा मंदिर येथे वधू वर महामेळाव्यात श्री. मरगाळे अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे शितल वेसणे, कार्याध्यक्ष शिवराज पाटील, सरचिटणीस जी. जी. कानडीकर, वधू वर मंडळ प्रमुख ईश्वर लगाडे व खजिनदार के. एल. मजूकर उपस्थित होते.
मराठा समाजातील मुलांनी नोकरीच्या मागे न धावता व्यवसाय करावा व नोकरी देणारा समाज निर्माण करावा अशी अपेक्षा व्यक्त करून युवकांनी व्यसनापासून दूर रहावे, असे आवाहन अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले. यावेळी श्री. वेसणे यांनीही शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला श्री. वेसणे यांनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी वधू वर मंडळाचे सदस्य ईश्वर लगाडे, के. एल. मजूकर, मोहन सप्रे, संग्राम गोडसे, राजू पावले, कविता देसाई यांना गौरविण्यात आले.
सुरवातीला जी. जी कानडीकर यांनी स्वागत तर शिवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. ईश्वर लगाडे यांनी वधू वर मंडळाचा आढावा घेतला. संग्राम गोडसे यांनी आभार मानले तर सुत्रसंचालन के. एल. मजूकर यांनी केले.
यावेळी कोल्हापूर, पुणे, मुंबई, गोवा, धारवाड व बंगलोर येथून वधू वर व पालक उपस्थित होते.
मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी अशोक अंकले, दत्तात्रय जाधव, प्रकाश गडकरी, महेश जुवेकर, रघुनाथ बांडगी, प्रदिप देसाई यांनी परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *