बेळगांव : येथील सहकार क्षेत्रातील सुवर्ण महोत्सवी संस्था दि. बेळगांव बेकर्स को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या सल्लागारपदी माजी नगरसेवक नेताजी नारायण जाधव आणि मराठा सहकारी बँकेचे संचालक विनोद सदाशिवराव हंगीरकर यांची निवड करण्यात आली आहे.
नेताजी जाधव यांनी श्री तुकाराम सहकारी बँकेचे चेअरमन म्हणून सहकार क्षेत्रात कार्य केले आहे तसेच श्री साईगणेश को-ऑप. सोसायटीची स्थापना त्यांनी केली आहे. बेळगांव महानगरपालिकेवर दोन वेळा नगरसेवक म्हणून त्यांनी जनतेची सेवा केली असून अनेक सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आहेत. विनोद हंगीरकर हे एक तरुण सामाजिक कार्यकर्ते असून, अनेक सामाजिक संस्थांचे ते पदाधिकारी आहेत. सहकार क्षेत्रातील अग्रेसर मराठा बँकेचे ते विद्यमान संचालक आहेत. या उभयतांच्या सहकार क्षेत्रातील अनुभवामुळे वरील निवड करण्यात आली आहे.
बेकर्स सोसायटीचे चेअरमन शिवाजी हंगीरकर आणि व्हाईस चेअरमन राजाराम सूर्यवंशी यांच्या हस्ते उभयतांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी संचालक शिवाजीराव जाधव, विजय पाटील, शंकर पाटील, शंकर गडकरी, गजानन बसरीकट्टी, संचालिका सौ. सुरेखा मेलगे, श्रीमती कल्पना पावशे, सेक्रेटरी सागर शहापूरकर, माजी सेक्रेटरी विनायक सायने व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
Belgaum Varta Belgaum Varta