बेळगाव : ‘ग्रामीण शिक्षण अभियाना’च्या माध्यमातून सरकारी प्राथमिक शाळेतील मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत मैदानी खेळांची आवड निर्माण व्हावी यासाठी ‘ऑपरेशन मदत’ ग्रुपतर्फे बेळगाव तालुक्याच्या पश्चिमेकडील कर्ले गावातील सरकारी शाळेतील मुला-मुलींना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. मार्चमध्ये परीक्षा झाल्यानंतर मोबाईलवर गेम खेळण्यात मग्न न राहता या लहान मुला-मुलींमध्ये मैदानी खेळांची आवड निर्माण होऊन त्यांची शारीरिक वाढही निरोगी व्हावी. म्हणून हे क्रीडा साहित्य (फुटबॉल, लगोरी सेट, स्किपिंग रोप्स, चेस सेट, रबर रिंग्ज, प्लास्टिक बॉल) यांनी वितरीत केले आहे.
जयवंत साळुंखे (धनश्री मेडिकल, हिंडलगा), संजय पुरोहित (राजस्थानी युवा मंच), आणि राहुल पाटील यांच्याहस्ते हे साहित्य देण्यात आले आणि वितरण करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजू तारिहाळकर, विठ्ठल देसाई आणि केशव सांबरेकर या ‘ऑपरेशन मदत’ ग्रुपच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta