बेळगाव : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बेळगाव उत्तर मतदार संघाच्या उमेदवार निवडीसाठी महाराष्ट्र एकीकरण समिती निवड समितीची रचना करण्यात आली असून या समितीत 21 सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.
उमेदवार निवड प्रक्रियेच्या निवडीसाठी प्रारंभी चार सदस्यांची निवड करण्यात आली होती. यामध्ये आता 21 जणांचा समावेश करण्यात आला आहे.
या निवड प्रक्रिया समितीत समाविष्ट करण्यात आलेल्या विभागवार समितीत गजानन मल्लाप्पा पाटील, गणेश ज्योतिबा ओऊळकर, रायमन संतान वाझ, दत्ता जाधव, नारायणराव खांडेकर, बाळाराम पाटील, मोहन निर्मलकर, सतीश बांदवडेकर, मोतेश बार्देशकर, सौ. रेणू किल्लेकर, सुनील मुरकुटे, बसवंत हलगेकर, संदीप चौगुले, शशी चोपडे, शिवाजी हासबे, नामदेव पाटील, विजय बोंगाळे, संजय मोरे, बंडू गोडसे, प्रमोद चौगुले, अरविंद अष्टेकर, पियुष हावळ, बळवंत शिंदोळकर, चेतन चव्हाण, सुनील बाळेकुंद्री, विनायक हुलजी यांचा समावेश करण्यात आला आहे.

बेळगाव उत्तर मतदार संघातील इच्छुक उमेदवारांतून एक उमेदवार निवडण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण करून त्या उमेदवाराच्या विजयासाठी सर्वोत्तोपरी प्रयत्न केले जातील.
Belgaum Varta Belgaum Varta