अधिकार ग्रहण समारंभ उत्साहात संपन्न
येळ्ळूर : येथील ‘नवहिंद सोसायटी’ आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. सर्व स्तरातील घटकांना आर्थिक मदत करून जनमाणसात आपले स्थान प्रस्थापित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहीन, असे विचार नूतन चेअरमन श्री. प्रकाश अष्टेकर यांनी अधिकार ग्रहण समारंभात मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त शिक्षक श्री. पी. ए. पाटील होते.
सुरवातीला अध्यक्षांनी नूतन संचालक मंडळाला गोपनीयतेची शपथ दिली. त्यानंतर चेअरमन आणि व्हा. चेअरमन यांचा अधिकार ग्रहण समारंभ पार पडला.
नूतन संचालक मंडळाने नवनवीन योजना राबवून संस्थेची भरभराट करावी, असे पी. ए. पाटील यांनी सांगितले. नवहिंद मल्टिपर्पज सोसायटीचे माजी चेअरमन दत्ता उघाडे यांनी नवहिंद सोसायटीच्या माध्यमातून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करावे आणि संस्थेची प्रगती करावी, असे सांगून नूतन चेअरमन आणि व्हा. चेअरमन यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी मावळते चेअरमन श्री. उदय जाधव यांनी गेल्या पाच वर्षाचा आढावा घेऊन नूतन चेअरमन आणि व्हा. चेअरमन यांना शुभेच्छा दिल्या. असि. जन. मॅनेजर श्री. नारायण वेर्णेकर, रिकव्हरी हेड श्री. जोतीबा नांदूरकर, मॅनेजर श्री. मदन पाटील आदींनी शुभेच्छापर भाषण केले.
या कार्यक्रमास संचालक प्रदीप मुरकुटे, सी. बी. पाटील, शिवाजी सायनेकर, संभाजी कणबरकर, श्रीधर धामणेकर, श्रीमती एस. वाय. चौगुले, सौ. नीता जाधव, भीमराव पुण्याण्णावर, नवहिंद मल्टिपर्पज सोसायटीतचे चेअरमन दशरथ पाटील, व्हा. चेअरमन नारायण जाधव, प्रियदर्शनी नवहिंद महिला सोसायटीच्या चेअरपर्सन सौ. माधुरी पाटील, व्हा. चेअरपर्सन सौ. सुरेखा सायनेकर, नवहिंद महिला प्रबोधन केंद्राच्या सेक्रेटरी सौ. संध्या हुंदरे, संध्या अष्टेकर, नयन उघाडे, सुनिता कणबरकर, वर्षा अष्टेकर, परशराम कंग्राळकर, वाय. एन. पाटील, नितीन कुगजी, प्रमोद जाधव, संतोष अष्टेकर, विवेक मोहिते, सर्व शाखांचे मॅनेजर,
कर्मचारी वर्ग, नवहिंद क्रीडा केंद्राचे कार्यकर्ते आणि सभासद बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद पाटील यांनी केले. शेवटी नूतन व्हा. चेअरमन श्री. अनिल हुंदरे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta