बेळगाव : तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. तालुका समिती (एन डी गट) आणि तालुका समिती (बी आय गट) दोन्ही समित्यांच्या बैठक संयुक्तपणे आयोजित करण्यात आली आहे.
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक येत्या गुरुवार दि. 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आली आहे. ओरिएंटल शाळेनजीकच्या तुकाराम महाराज ट्रस्ट हॉलमध्ये होणाऱ्या या बैठकीत बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या एकीसंदर्भात विचार विनिमय केला जाणार आहे. तेंव्हा आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी सदर बैठकीला हजर राहावे, असे आवाहन तालुका म. ए. समितीच्या दोन्ही गटांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta