बेळगाव : शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे धडाडीचे युवा नेते मदन बाबुराव बामणे यांनी दक्षिण मतदार संघात विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज शहर समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला.
मदन बामणे हे मागील 23 वर्षांपासून समितीमध्ये कार्यरत आहेत तर मागील 20 वर्षांपासून शहर समितीचे कार्यकारिणी सदस्य आहेत. आजपर्यंत समितीने पुकारलेल्या प्रत्येक लढ्यात अग्रभागी असतात. 2004 पासून आजतागायत झालेल्या प्रत्येक निवडणुकीत तन, मन, धन अर्पूण त्यांनी काम केलेले आहे. लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. राजकारणासोबत मदन बामणे यांनी सामाजिक बांधिलकी देखील जपली आहे. कोविड सारख्या महामारीमध्ये लोकवर्गणीतून त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कोविड सेंटर यशस्वीरीत्या चालविले त्यातून अनेकांना जीवदान दिले आहे. एकीकडे हजारो रुग्ण आपले प्राण गमावत असताना मदन बामणे यांनी स्वतः जातीने लक्ष देऊन 150 हुन अधिकृग्न बरे केले. ते अनेक सामाजिक संघटनातून सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्य करत असतात. मदन बामणे हे मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे सचिव, गणेशोत्सव महामंडळाचे उपाध्यक्ष, जत्तीमठ देवस्थानचे उपाध्यक्ष, तुकाराम बँकेचे संचालक तसेच जयंट्स आय फौंडेशनचे संस्थापक म्हणून देखील ते कार्यरत आहेत. एक कुशल संघटक म्हणून त्यांची ख्याती आहे.
Belgaum Varta Belgaum Varta