बेळगाव : वडगावसह उपनगरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव्याप वाढलेला आहे. वारंवार मागणी करून देखील महानगरपालिका मोकाट कुत्र्यांचे बंदोबस्त करण्यात अयशस्वी ठरत आहे.
संभाजीनगर वडगाव येथे पाच वर्षाच्या बालकावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला आहे. नागरिकांच्या जागरूकतेमुळे मोठा अनर्थ टळला. तथापि वारंवार मागणी करून देखील महानगरपालिकेने मोकाट कुत्र्यांवर कारवाई केली नसल्यामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. संभाजीनगर वडगाव येथील पाच वर्षाचा रितेश सुनील ओळकर घरासमोर खेळत होता. अचानक दोन काट कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला चढविला. त्यामुळे मुलांनी आरडा ओरड केला. आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी तातडीने धाव घेतली व कुत्र्यांना उसकावून लावले रितेशच्या कमरेवर कुत्र्यांनी हल्ला केलेला च्या जखमा झालेल्या आहेत. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून वडगाव परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढलेला आहे. वडगाव स्मशानभूमी लगत रात्री एका इसमावर कुत्र्यांनी हल्ला केला होता त्या हल्ल्यात तो इसम मृत्यू पावला तरी देखील अजूनही महानगरपालिकेला जाग आलेली नाही. वारंवार तक्रारी करून देखील महानगरपालिका प्रशासन व स्थानिक नगरसेवक या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत आहेत त्यामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta