बेळगाव : शहापूर, वडगाव, अनगोळ, जुनेबेळगाव, येळ्ळूर, धामणे तसेच परिसरातील शिवारात रात्री 8 ते 11 पर्यंत दारू, सिगारेट त्याचबरोबर खाण्यासाठी इतर पदार्थ आणून शेतात घोळका करून बसतात व पार्टी करून झाल्यानंतर कचरा शेतात इतरत्र टाकून दारूच्या बाटल्या फोडून काचा पसरवून जातात. शहापूर शिवार धामणे आदी परिसरात जुगार खेळ रंगात येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. पोलीस प्रशासनाने या दारू जुगार पार्ट्यांवर निर्बंध घालावेत. अशी मागणी परिसरातील शेतकर्यांनी केला आहे.
संबंधित पोलीस ठाण्यांनी शेतशिवारात रात्रीची गस्त घालून दारू पार्ट्या करणार्यांवर कारवाई करावी व शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान टाळावे. तळीरामानी टाकलेल्या दारूच्या बाटल्या व खाद्यपदार्थांच्या पिशव्यांचा व कचरा साफ करणे हा शेतकर्यांचा दिनक्रम बनला आहे. मागीलवर्षी शेतात जवळपास दोन बैलगाड्या कचरा जमा केला होता. यावर्षी त्यापेक्षा जास्त कचरा शेतकर्यांना जमा करावा लागणार आहे. मागीलवर्षी रयत संघटनेतर्फे ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सुनीलकुमार नंदेश्वर यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले होते. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. यावेळी मा. जिल्हाधिकार्यांच्या फोन इन कार्यक्रमात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta