Tuesday , December 9 2025
Breaking News

शिवजयंती उत्सव 24 मे रोजी साजरा करा : पोलिस आयुक्तांनी केली सूचना

Spread the love

 

बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यासाठी बेळगाव शहर व उपनगरात ठिकठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात तयारी सुरु होत असते. येत्या 22 एप्रिल रोजी शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी 11 वाजता पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस आयुक्त बोरलिंगय्या यांची भेट घेतली.

यावेळी पोलीस आयुक्त बोरलिंगय्या यांनी हा उत्सव सुरळीत पार पडावा यासाठी बेळगावातील शिवजयंती उत्सव मंडळानी यावर्षी शिवजयंती 24 मे ला साजरी करावी अशी सूचना सुरवातीलाच केली. यावेळी उत्सवादरम्यान निवडणूक आचारसंहिता आल्याने यावर्षीची शिवजयंती चित्ररथ मिरवणूक तुम्हाला रात्री 10 वाजता समाप्त करणे बंधनकारक ठरणार आहे. जर का 24 एप्रिल रोजी मिरवणूक काढली तर पोलीस प्रशासनाने व निवडणूक अधिकाऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यायचे ठरवले आहे. शिवजयंती उत्सव साजरा करताना कायदा सुव्यवस्था राखत उत्सव साजरा करावा, तसेच उत्सवाप्रसंगी चित्ररथ मिरवणुकीत शासनाच्या आदेशाप्रमाणे डिजेला (DJ) कुठल्याही प्रकारची परवानगी असणार नाही, सर्व मंडळांना परवानगी घेणे बंधनकारक आहे. रात्री 10 पर्यंतच्या वेळेचे पालन करावे, आचारसंहिता असल्याने फलक बॅनरची परवानगी घेणे आवश्यक असणार आहे. त्यावरील मजकुरांची पोलिस पाहणी केल्यानंतर परवानगी देण्यात येईल, कुठलाही देखावा राजकीय नसावा. डिजे लावण्यापेक्षा सामाजिक देखावे, प्रबोधन, व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रम घेत छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र तरुण पिढीपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करावा, सामाजिक दृष्टीकोनातून काम करावे अशा सूचना आयुक्तांनी केल्या.
आचारसंहिता असल्यामुळे शिवजयंती साजरी करताना आचारसंहितेमुळे अनेक निर्बंध येणर असल्यामुळे कार्यकर्त्यांच्या वर मर्यादा येणार आहेत. त्यामुळे 24 मे हया तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या लौकिकाला साजेसा असा उत्सव साजरा करू शकत असल्याने चित्ररथ मंडळांना 24 मे हीच तारीख सोयीची होणार आहे. असे चित्र स्पष्ट झाले आहे.
चित्ररथातून छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य नवीन पिढी समोर आणण्याचे काम चित्ररथातून होत असते. रात्री दहाच्या आत मिरवणुका बंद केल्यास वेळेच्या मर्यादेमुळे तो उद्देश असफल होणार असल्याने शिवजयंती उत्सवावर काहीसा विपरित परिणाम घडू शकतो. बेळगावच्या शिवजयंती उत्सवाचा लौकिक देशभर असल्याने त्यांच्यात कोणते कमतरता येऊ नये असे कार्यकर्त्यांचे मत आहे. त्यामुळे 24 मे ही तारीख चित्ररथ तयारीसाठी व पूर्ण वेळ कला सादरी करण्यासाठी उपयुक्त असल्याचे सर्व मंडळाचे मत असल्याने आयुक्तांच्या 24 मे या तारखेला सर्वांनी संमती दर्शविली आहे.
यावेळी शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव, संतोष कणेरी, मेघन लगरकांडे, प्रसाद मोरे, जे बी शहपूरकर, अरुण पाटील, आदित्य पाटील, विजय जाधव, रवी कलघटगी विनायक बावडेकर, यासह अन्य शिवभक्त उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी २५ हजार शेतकरी उद्या सुवर्णसौधला घेराव घालणार

Spread the love  बेळगाव : राज्य सरकारच्या विरोधात अन्नदात्यांचा संताप अनावर झाला असून, उद्या शेतकरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *