Tuesday , December 9 2025
Breaking News

भाजपने तिकीट नाकारले तर लक्ष्मण सवदी काँग्रेसच्या वाटेवर?

Spread the love

 

बेंगळुरू : अथणी मतदारसंघातील भाजपच्या तिकिटासाठी माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि महेश कुमठळ्ळी यांच्यात चाललेली रस्सीखेच नवीन नाही. या मतदारसंघाचे तिकीट वाटप भाजपसाठी डोकेदुखी ठरले आहे. त्यातच लक्ष्मण सवदी हे काँग्रेस नेत्यांच्या सतत संपर्कात असल्याचे वास्तव समोर आले आहे.
एकीकडे लक्ष्मण सवदी हे अथणीच्या तिकीटासाठी भाजप नेत्यांवर दबाव आणत आहेत, तर दुसरीकडे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी महेश कुमठळ्ळी यांना तिकीट द्यावे, असा आग्रह धरला. त्यामुळे भाजप नेत्यांची कोंडी झाली आहे. या घडामोडीत लक्ष्मण सवदी हे गेल्या 20 दिवसांपासून काँग्रेस नेत्यांच्या सतत संपर्कात असून भाजपने तिकीट नाकारले तर ते काँग्रेस हात धरतील, असे बोलले जात आहे.
शेवटच्या क्षणात लक्ष्मण सवदी कोणती भूमिका घेणार हे पाहणं कुतूहलाचे आहे.

About Belgaum Varta

Check Also

युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन

Spread the love  बेळगाव : बेळगावमध्ये कर्नाटक प्रशासनाकडून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांवर, शिवसैनिक आणि मराठी कार्यकर्त्यांवर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *