बेळगाव : ग्रामीण मतदार संघातून समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून युवा नेते आर.एम.चौगुले यांची निवड करण्यात आली आहे.
बुधवार दि.12 रोजी मराठा मंदिर रेल्वे ओव्हर ब्रीज येथे 129 सदस्यांच्या निवड कमिटीच्या बैठकीत मतदान प्रक्रियेद्वारे निवड करण्याचा निकष ठरविण्यात आला. तालुका समितीकडे ग्रामीण मतदारसंघातुन पाच इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. यामध्ये आर.एम.चौगुले, शिवाजी सुंठकर, आर.आय.पाटील, सुधीर चव्हाण, मोदगेकर आदींचा समावेश होता. प्रारंभी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या निवड कमिटी व इच्छुकांचे एकमत होऊन गुप्त मतदान प्रक्रिया राबवून एका उमेदवाराची निवड करण्यात यावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले. मतदान प्रक्रिया पार पडण्याचे सर्वाधिकार निवड कमितीकडे सोपविण्यात आले होते त्यानंतर निवड कमिटीच्या सर्व 129 सदस्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला एकूण या निवड प्रक्रिएमध्ये आर.एम. चौगुले याना बहुमत मिळाले सदर उमेदवारीची घोषणा तालुका समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर व निवड कमिटीने केली.या निवडीला सर्व इच्छुक उमेदवारासह उपस्थित कार्यकारिणी व निवड समितीच्या सदस्यांनी अधिकृत उमेदवार आर.एम. चौगुले यांचे अभिनंदन केले.
Belgaum Varta Belgaum Varta