बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठी मराठी प्रबोधितर्फे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दिनांक 14 एप्रिल रोजी निमंत्रित कवींचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे औचित्य साधून हे कवी संमेलन घेण्यात आले. प्रबोधिनीचे सचिव सुभाष ओऊळकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले व प्रबोधिनीचे अध्यक्ष श्री जयंत नार्वेकर यांनी प्रास्ताविक केले. श्री. जयंत नार्वेकर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी निमंत्रित कवी प्रा. अशोक अलगोंडी , बसवंत शहापूरकर, हर्षदा सुंठणकर जोतिबा नागवडेकर, प्रा. संजय बंड उपस्थित होते. कवी संमेलनामध्ये कवी जोतिबा नागवडेकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्यावरील कविता सादर केल्या कवी प्राध्यापक संजय बंड यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावरील कविता सादर केली कवी बसवंत शहापूरकर यांनी निसर्गा विषयी कृतज्ञता व्यक्त करणारी वंदन ही कविता तसेच बालपण ही कविता सादर केली कवी हर्षदा सुंठणकर यांनी झळा व जाहिरात यासारख्या, आशयघन कविता सादर केल्या प्रा.अशोक अलगोंडी यांनी तीन माकडे, गाराणा यासारख्या वास्तवदर्शी कविता सादर केल्या प्रत्येक कवीने आपल्या कवितांमधून सामाजिक वास्तव महापुरुषांचे कार्य आणि आजची परिस्थिती याविषयी भाष्य करणाऱ्या कविता सादर केल्या. यावेळी मालोजी अष्टेकर, सुरेश गडकरी, सुरेश पाटील, प्रा.डी टी पाटील, विजय बोंगाळे, अनंत जांगळे, नीला आपटे, एन.सी.उडकेकर, गजानन सावंत, मराठी विद्यानिकेतनचे सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धीरजसिंह राजपूत, इंद्रजीत मोरे, प्रसाद सावंत यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन श्री. बी. बी. शिंदे सर यांनी केले. आभार इंद्रजित मोरे यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta