Thursday , March 5 2026
Breaking News

२७ मे रोजी शिवजयंती चित्ररथ मिरवणूक!

Spread the love

 

बेळगाव : पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात येणाऱ्या शिवजयंतीनिमित्त काढण्यात येणारी चित्ररथ मिरवणूक शनिवार दि. २७ मे २०२३ रोजी काढण्याचा निर्णय मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या तातडीच्या बैठकीत घेण्यात आला.
शिवजयंती उत्सव दि. २२ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. पण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चित्ररथ मिरवणूक काढण्यास तांत्रिक अडचणी येत आहेत त्यावर विचार विनिमय करून मिरवणुकीची तारीख ठरविण्यासाठी आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रकाश मरगाळे होते.
सुरुवातीला सरचिटणीस मदन बामणे यांनी प्रास्ताविकात बैठकीचा उद्देश सांगून करून उपस्थित शिवभक्तांचे स्वागत केले.
त्यानंतर उपाध्यक्ष रमाकांत कोंडूसकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर, विनायक बावडेकर, सुनिल जाधव यांनी चर्चेत भाग घेतला. शेवटी प्रकाश मरगाळे यांनी शनिवार दि. २७ मे २०२३ ही तारीख सर्वानुमते ठरली असल्याचे सांगून ही मिरवणूक नरगुंदकर भावे चौकातुन संध्याकाळी सहा वाजता पालखीचे पूजन करून सुरुवात करण्यात येणार आहे.

२२ एप्रिल रोजी सकाळी ०९३० वाजता छत्रपती शिवाजी उद्यानातील शिवमूर्तीचे पूजन करण्यात येणार आहे. प्रत्येक शिवजयंती उत्सव मंडळाने आपापल्या गल्लीत शिवजयंती साजरी करावी असेही सांगण्यात आले. शेवटी रणजीत चव्हाण पाटील यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *