येळ्ळूर : महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार श्री. रमाकांत कोंडुसकर यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष श्री. दुद्दापा बागेवाडी होते.
बैठकीच्या सुरवातीला सरचिटणीस प्रकाश अष्टेकर यांनी ही विधानसभा निवडणूक सीमाप्रश्नाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या निवडणुकीत समितीचे उमेदवार विजयी होणे आवश्यक असल्याचे सांगितले. तालुका म. ए. समितीचे उपाध्यक्ष श्री. दत्ता उघाडे यांनी, प्रचारयंत्रणेसंर्भात माहिती देवून सर्वांनी तन, मन लावून प्रचार करण्याचे आवाहन केले.
येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतिश पाटील यांनी सर्व ग्रामपंचायत सदस्य म. ए. समितीच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहतील, अशी ग्वाही दिली. बैठकीचे अध्यक्ष दुद्दापा बागेवाडी यांनी विभागावार कमिट्या करून नियोजनबद्ध प्रचारयंत्रणेसंदर्भात माहिती दिली.
बेळगाव दक्षिण मतदारसंघाच्या प्रचाराचा शुभारंभ येळ्ळूर येथील श्री चांगळेश्वरी मंदिरात ‘राखणीचा नारळ’ ठेवून करण्याचे ठरले.
या बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर (दक्षिण), अमर येळ्ळूरकर (उत्तर), आर. एम. चौगुले (ग्रामीण), मुरलीधर पाटील (खानापूर) आणि मारूती नाईक (यमकनमर्डी) यांचे अभिनंदन करण्यात आले.
या बैठकीला माजी ता. पंचायत सदस्य चांगदेव परीट, ग्रामपंचायत सदस्य रमेश मेणसे, शिवाजी नांदुरकर, राकेश परीट, परशराम परीट, ग्रामपंचायत सदस्या सौ. मनिषा घाडी, शालन पाटील, सोनाली येळ्ळूरकर, वनिता परीट, मनोहर घाडी, कृष्णा शहापूरकर, बाळकृष्ण पाटील, शिवाजी हणमंत पाटील, मधु पाटील, रामदास धुळजी, तानाजी पाटील, प्रकाश मालुचे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी उपाध्यक्ष श्री. राजू पावले यांनी आभार प्रदर्शन केले.
Belgaum Varta Belgaum Varta