Thursday , March 5 2026
Breaking News

ऍड. अमर येळ्ळूरकर यांना बसवन कुडची येथे एकमुखी पाठिंबा

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव उत्तरचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार ऍड. अमर येळ्ळूरकर यांना सर्वस्थरातून वाढता पाठिंबा मिळत आहे. अमर येळ्ळूरकर यांनी आपल्या शिलेदारांसमवेत प्रचाराचा झंझावात सुरू केला आहे. समितीचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या बसवन कुडची येथील नागरिकांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार ऍड. अमर येळ्ळूरकर यांना एकमुखी पाठिंबा दिला आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार ऍड. अमर येळ्ळूरकर यांनी बसवन कुडची येथे जाऊन नागरिकांची भेट घेतली व सर्वांचे आशीर्वाद घेतले. यावेळी बसवंत हलगेकर, सुनील बाळेकुंद्री, सुरज कणबरकर, ऍड. दिवटे तसेच कुडची येथील प्रतिष्ठित नागरिक व पंच कमिटी ग्रामस्थ उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *