
बेळगाव : समितीचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या मच्छे गावामध्ये बैठक बोलाविण्यात आली होती. त्या बैठकीमध्ये बेळगाव दक्षिणचे समितीचे अधिकृत उमेदवार श्री. रमाकांत दादा कोंडुस्कर यांना एकमुखी पाठिंबा जाहीर करण्यात आला.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार श्री. रमाकांत दादा कोंडुस्कर यांनी भेट देऊन सर्वांचे आशीर्वाद घेतले. मच्छे येथील नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. शेकडोंच्या संख्येने गावातील आजी माजी ग्रामपंचायत सदस्य समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, बेळगाव दक्षिण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांच्या प्रचाराचा झंझावात सर्वत्र चालू आहे. विविध संघटनांकडून तसेच ग्रामस्थांकडून रमाकांत दादा कोंडुस्कर यांना वाढता पाठिंबा मिळत आहे. नुकताच रमाकांत दादा कोंडुस्कर यांनी शहरातील छत्रपती शिवाजी उद्यान, बॅ. नाथ पै उद्यान, सायन्स उद्यान टिळकवाडी, डेपो मैदान, उषःकाल मॉर्निंग ग्रुप आदी ठिकाणी भेटी दिल्या व वृद्ध महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच युवकांशी संवाद साधला. सर्व स्तरातून रमाकांत दादा कोंडुस्कर यांना वाढता पाठिंबा मिळत आहे. आपला हक्काचा माणूस आपल्या सेवेसाठी येणार अशी काहीशी भावना जनसामान्य माणसातून पाहायला मिळत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta