
बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांचा उमेदवारी अर्ज उद्या सकाळी अकरा वाजता दाखल करण्यात येणार आहे.
धर्मवीर संभाजी चौकातून भव्य मिरवणुकीने कॉलेज रोडमार्गे चन्नमा सर्कल काकतीवेसहुन रिसालदार गल्लीतील तहसीलदार कार्यालयात अर्ज भरणार आहेत.
तरी तालुक्यातील सर्व आजी माजी जिल्हापंचायत, तालुका पंचायत, ग्रामपंचायत सदस्य तसेच महिला मंडळे, युवक मंडळे, भजनी मंडळे व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे तसेच येताना भगवे ध्वज, भगवे फेटे, टोप्या व शाली घालून यावे असे आवाहन कार्याध्यक्ष मनोहर किणेकर आणि सरचिटणीस एम. जी. पाटील यांनी केले आहे.
बेळगाव ग्रामीण मतदार संघात महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा फडकवण्यासाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मतदारसंघातील मतदार बंधूंनी हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे व आपला मराठी बाणा विरोधकांना दाखवावा असे आवाहन माजी आमदार मनोहर किनेकर यांनी केले. मंगळवार दिनांक 18 रोजी आर. एम. चौगुले यांच्या मध्यवर्ती कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.या बैठकीचे अध्यक्षस्थानी बेळगाव तालुका महाराष्ट्र टिकीकरण समिती उपाध्यक्ष अँड राजाभाऊ पाटील होते.
युवा आघाडीचे चिटणीस मनोहर संताजी आणि प्रास्ताविक केरून उपस्थिताचे स्वागत केले. बुधवार दिनांक 19 रोजी सकाळी ठीक साडेदहा वाजता धर्मवीर संभाजी चौक येथून ग्रामीण मतदार संघातील म. ए. समीतीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांच्या अर्ज भरण्याच्या फेरीला सुरुवात होणार आहे. धर्मवीर संभाजी चौक येथून तहसीलदार कार्यालयापर्यंत ही मिरवणूक निघणार आहे, रिसालदार गल्ली येथील तहसीलदार कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. यासंदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर लक्ष्मण होनगेकर, रामचंद्र मोदगेकर, एम. जी. पाटील, ऍड. राजाभाऊ पाटील, मनोहर किणेकर, मनोज पावशे, आर. आय. पाटील, सुधीर चव्हाण, बळीराम पाटील, कमळ मन्नोळकर, सरस्वती पाटील उपस्थित होते.
यावेळी सुधीर चव्हाण म्हणाले की, आर. एम. चौगुले हे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आहेत. तरी त्यांना येत्या निवडणुकीत विजयी करून कर्नाटकाच्या विधानसभेमध्ये पाठवून सीमा भागाचा बुलंद आवाज दाखविला पाहिजे, यासाठी यांचा अर्ज भरताना तालुक्यातील सर्व युवकांनी, तरुणांनी, ज्येष्ठनी, महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहायचे आहे. सीमा लढा हा लोक लढा आहे आमच्या मातृभाषेच्या रक्षणासाठी मराठी भाषेच्या अस्मितेसाठी आपण गेली 66 वर्षे हा लढा लढतो आहे. हा भाग महाराष्ट्रात विलीन करण्यासाठी आम्ही अनेक लढत लढत असताना त्याचाच एक भाग म्हणून निवडणुका लढवत आहोत.तेव्हा येणार्या निवडणुकीत आमचे उमेदवार आर. एम. चौगुले यांना मोठ्या संख्येने विजयी करून करणे गरजेचे आहे. यासाठी यांचा उमेदवारी अर्ज भरताना आपण हजारोच्या संख्येने उपस्थित राहून विरोधकांना आपली ताकद दाखवून दिली पाहिजे.
यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीने डी बी पाटील, आर. के. पाटील, डॉ. नितीन राजगोळकर, सागर खांडेकर, प्रशांत पाटील, प्रा. अरविंद पाटील, प्रा. मधुरा गुरव, माजी तालुका पंचायत सदस्या कमल मंडोळकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील, मनोज पावशे, आर. आय. पाटील, ऍड. सुधीर चव्हाण, लक्ष्मण होनगेकर, माणिक होनगेकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र मोदगेकर, चिटणीस ऍड. एम. जी. पाटील, उमेदवार आर. एम. चौगुले, ऍड. राजाभाऊ पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले.
शेवटी मनोहर संताजी आणि सूत्रसंचालन करून आभार व्यक्त केले.
Belgaum Varta Belgaum Varta