बेळगाव : उवा मेरिडियन काँन्वेशन सेंटरच्या सभागृह सेईकोकाई आंतरराष्ट्रीय इंडिया व कर्नाटक व फिनिक्स अकादमी इंडिया यांच्या संयुक्त विद्यामानाने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सेंट झेवियर्स शाळेच्या आराध्या निवास सावंत हिने 1 सुवर्ण 1 रौप्यपदक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
सबज्युनियर गटात कुमिटे प्रकारात सुवर्णपदक, तर कटाज प्रकारात रौप्यपदक पटकावित यश संपादन केले. तिला कराटे प्रशिक्षक विनायक मोरे यांचे मार्गदर्शन तर शाळेच्या क्रीडा शिक्षिका दीपा सत्तेगिरी, ज्युलेट फर्नांडिस चेस्टर रोझारियो व शाळेचे प्राचार्य फादर सिरील ब्रॅग्ज व शिक्षक वर्गांचे प्रोत्साहन लाभात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta